Biography : Urun Islampur Municipal Council
Upadate : Thursday, 29 September 2013, 09:15 IST

उरूण इस्लामपूर नगरपरिषद इस्लामपूर
ता. वाळवा,जि. सांगली

इस्लामपूर शहर हे सांगली जिल्हयातील एक प्रमुख शहर असून इस्लामपूर नगरपरिषदेची स्थापणा दिनांक 18/11/1853 रोजी झालेली आहे. सन 2001 चे जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 58330 इतकी आहे. इस्लामपूर नगरपरिषद ही ब वर्ग नगरपरिषद आहे. इस्लामपूर शहराचे क्षेत्र 4042 हेक्टर म्हणजेच 40.48 चौ.कि.मी. आहे. नगरपरिषद हद्दीत एकुण प्रभाग संख्या 7 असून 26 वॉर्ड आहेत. त्यामधून 13 नगरसेवक व 13 नगरसेविका निवडून आलेल्या आहेत. तसेच 3 स्विकृत नगरसेवक आहेत. अशी 29 नगरसेवकांची संख्या कार्यान्वित आहेत.

इस्लामपूर नगरपरिषद शहराच्या पश्चिम हद्दीपासून पुणे - बेंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग क्रं. 4 सर्व साधारणपणे 2.5 कि.मी. असून पेठ सांगली राज्यमार्ग क्रं. 138 हा शहरातून जातो.

इस्लामपूर शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकने 7 पाण्याच्या टाक्या बांधल्या असून हे पाणी शहराच्या 8 कि.मी. अंतरावरून कृष्णा नदीतून दोन टप्प्यातून पुरवले जाते.

इस्लामपूर शहरात नगरपालिकेने नागरिकांसाठी अद्यावत भाजी मार्केट, दोन ते चार बगीचे, शॉपिंग सेंटर, दुकानगाळे, स्विमींगपुल, क्लबहाउस, सार्वजनिक वाचनालय, व्यायामशाळा, समाजमंदिरे, दवाखाना, इमारती, प्राथमिक शाळा, अद्यावत स्मशानभुमी इ नागरी सुविधा पुरवत आहे.

नगरपरिषदेसाठी या पुर्वी एकात्मिक लहान व मध्यम शहराची 4 कोटी रूपयाची विकास योजना मंजूर झालेली असून त्यामध्ये हॉल, शॉपिंग सेंटर , व्यायामशाळा, बगीचे इ. सोयी नागरिकांना उपलब्ध करून देण्याची कामे पुर्ण झालेली आहेत.
इस्लामपूर शहर हे भौगोलिक आलेख पाहता समृध्द असे वाढते शहर असून भोवताली सुपिक जमिन, पुरेसा पाउस, शेतीला पाणी पुरवठयाच्या नियमित सोयी, भागात उभारलेले व अंत्यत चांगल्या पध्दतीने चालविले जाणारे शेतीमाल पकिया उद्योग, दुग्ध व्यवसायासारखे जोड धंदयाचे जाळे यामुळे नगरपरिषद नवनवीन नागरी वसाहती, शैक्षणिक सुविधा, अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये, कुसूमगंध उद्यान बागबगिचे, नाटयगृह, क्रीडा संकुले, रस्ते सुधारणा, आय.एच.डी.पी. च्या माध्यमातून झोपडपट्टी विकास, पाणी पुरवठा योजना, बचतगट, सार्वजनिक शौचालये, स्वच्छता, कचरा याचे व्यवस्थापण, इ. आरोग्यविषयक सुविधा वाढविणारे उपक्रम राबवते. शहराची वाढती लोकसंख्या, वाहने, वाहतुक खत प्रकल्प, प्रदूषण मुक्त शहरासाठी विविध उपाययोजना, अग्निशमन, शिक्षण विषयक प्रेरणा प्रकल्प, स्त्री - भुण हत्या विरोधी कन्या वाचवा अभियान, कला सांस्कृतिक वारसा जोपसण्यासाठी नाटयगृहाची उभारणी,विस्तारित पाणी पुरवठा योजना अशा प्रकारच्या सर्व वैयक्तिक आणि सामाजिक द्रूष्टया निर्माण होणारया गरजा पुर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

उरूण इस्लामपूर नगरपरिषद तक्रार निवारण टोल फ्री नंबर :- १८००२३३२३७९ (24x7 Service)
तक्रार निवारण कक्षासाठी स्वतंत्र दूरध्वनी क्र. (०२३४२) २२१२२, तसेच SMS सुविधा कार्यान्वित आहे.

इस्लामपूर नगरपालिकेस सन 2006 -07 चा संत गाडगेबाब नागरी स्वच्छता अभियान व पंडित जवाहरलाल नेहरू स्वच्छ व सुंदर शहर म्हणून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे.

उरूण इस्लामपूर नगरपरिषद पालिकेकडून केलेली विकासकामे
1. पाण्याची एकुण 29.90 लाख लि. साठवण क्षमता.
2. पाणी पुरवठा योजनेसाठी सतत विजेची सोईसाठी स्वतंत्र विजवाहिणी. - अंदाजे 25 लाख रूपये.
3. फिरती शौचलय व्यवस्था
4. पे अॅन्ड यूज तत्वावर शौचालयाची सुपर भाजी मार्केटमध्ये सुविधा.
5. 4.93 हे. स्व मालकीचे कचरा डेपोसाठी जागा तसेच महाराष्ट प्रदूषण नियंत्रण अॅथोरायजेशन प्राप्त.
6. ओल्या कचऱ्यापासून गांडूळखत प्रकल्प सुरू. 5 मॅट्रीक टन प्रतिदिन.
7. कचरा उचलण्यासाठी 5 घंटारिक्षा, 3 टॅक्टर व 1 डंपर प्लेसर, 30 बंदिस्त कंटेनर.
8. सरपेक्स वॉटर ड्रिनीज 4 कि.मी.व स्टॉर्म वॉटर ड्रिनीज 1 कि.मी. सोय.
9. दारिद्रय रेषेखाली स्थापण करण्यात आलेल्या सर्व महिला बचत गटांना युनिव्र्हसेल विमा योजना लागू.
10. नगरपरिषदे तर्फे 3 फायर फायटर , वॉटर टॅकर 5 उपलब्ध आहेत.

इस्लामपूर नगरपरिषद प्रशासकीय स्टाफ -
अ.नं. नांव पद
1 श्री. दिपक झिंजाड मुख्याधिकारी
2 श्री. आनंद संपत कांबळे प्रभारी प्रशासन अधिकारी
3 श्री. आर.आर.खांबे पाणी पुरवठा अधिकारी
4 श्री.एस.एम.कांबळे नगररचना विभाग
5 श्री. नारायण पाटोळे आरोग्य अधिकारी
6 श्री. पी.बी.पाटील कर अधिक्षक
7 श्री. अनिल नाईक आस्थापण विभाग
8 श्री. विजय टेके लेखापाल
9 श्री. शामसुंदर खटावकर बांधकाम विभाग
10 श्री. परशुराम गायकवाड सुवर्ण जयंती विभाग
11 श्री. मोहन घोरपडे सुवर्ण जयंती विभाग
वाहन विभाग
पाणी पुरवठा संपर्क
अ.नं. नांव संपर्क नं.
1 साहेबराव जाधव 02342 - 223398
2 अग्निशामक दल 101

नगराध्यक्ष - श्री.
उपनगराध्यक्ष - श्री.
सार्वजनिक बांधकाम समिती शिक्षण क्रिडा व सांस्कृतीक कार्य समिती
मे . सौ. सभापती मे . श्री. सभापती
 
पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समिती महिला व बालकल्याण समिती
मे . सौ. सभापती मे . सौ. सभापती
 
स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती स्थायी समिती
मे . सौ .े सभापती मे . सौ . सभापती
 
नियोजन व विकास समिती
मे . सौ . सभापती
अधिक माहितीसाठी लॉगइन करा, www.urun-islampur.in या संकेत स्थळावर...
SYM Hall Islampur
Jayraj Gas Agency Islampur