Biography : श्री संभुआप्पा बुवाफन मठ पार्श्वभूमी
Upadate : Thursday, 09 October 2013, 03:.30 IST

श्री संभुआप्पा बुवाफन मठ पार्श्वभूमी
संभुआप्पा व बुवाफन यांच्या रूपाने उरूण इस्लामपूर परिसरात हे महान संत होवून गेले.त्यंचो कार्य व मार्ग आजही लाख मोलाचा ठरतो. म्हणूनच आजच्या पिढीला या देवस्थानचे महत्व समजावे म्हणून हया हेतूने आम्ही ही माहिती आमच्या वेबसाईटवर देवस्थान कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रसिध्द करीत आहोत.

    भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्हयातील इस्लामपूर हे शहर पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र.4 पासून तीन किमी अंतरावर आहे. इस्लामपूर शहर म्हणजे उरूण व इस्लामपूर या दोन गावापासून तयार झालेले इस्लामपूर हे शहर ऐतिहासिक वारसा जपणारे क्रांतिकारी व शैक्षणिक शहर म्हणून स्वातंत्र्यपूर्व कालखंडपासून सुप्रसिध्द आहे.
इस्लामपूरला वैभवशाली आशी ऐतिहासिक परंपरा आहे. तत्कालिन सांगली जिल्हयाच्या उरूण इस्लामपूर गावी मुस्लिम लोकांची संख्या लक्षणिय होती. गावातील चारही बाजूस असणारी पिर यांची साक्ष देतात गावचे मुळचे नांव ईश्वरपूर कारण इथे मंदिरांची संख्या भरपूर हिंदूची संख्या ही अधिक उरूण व इस्लामपूर यांच्या मधोमध उरूणाई देवीचे मंदिर होते. पूर्वी ही दोन्हीं स्वतंत्र गावे होती. परंतु कालांतराने उरूण-इस्लामपूरच्या रेषाच पुसल्या गेल्या व इस्लामपूर एकच झाले.
ब्रिटिश दप्तरीसुध्दा उरूण इस्लामपूर आशीच नोंद होती. गावचे हे नांव सार्थक करणारे हिंदू व मुस्लीम धार्मियांची अपारश्रध्दा असणारे पवित्रस्थान म्हणजेच श्री संभुआप्पा बुवाफन मठ. सुमारे 350 वर्षांपूर्वी ज्या काळता स्पृश्यता, जातीभेद बोकाळलेली होती, अशा काळता उरूणात वास्तवास असलेल्या श्री संभुआप्पांनी त्याचाही अगोदर 350 वर्ष होवून गेलेल्या श्री बुवाफन यांना गुरू मानले तसे पाहिले तर संभुआप्पा हे लिंगायत कोष्टी समाजातील तर श्री बुवाफन हे मुस्लीम होते.
लहान मुलांमध्ये खेळणारा गांडस, ( सोनेरी केसाचा ) हा बालक कोण नेमका कुठून आला. कुणालाही पत्ता नाही. सोनेरी केसाच्या अपेक्षेणे एकाने त्याचे केस धरू पाहिले तर तो जमिनीत अंतर्धान पावला हाती फक्त सोनेरी केसच राहीले. त्या केसाची पुजा होऊ लागली एका भक्ताने ते केस शिरोळ गावी नेले व तेथे स्मारक उभा केले.
बुवाफन महाराज मालेगांव मध्ये फकीर वेषात अवतार घेऊन बुवाफन यांनी समाजकार्य केले त्यांच्या पश्चात अनेक शिष्यगण तयार झाले त्यांपैकी एक संभुआप्पा. मालेगांवच्या सालमाळगी घराण्यात पारंपारिक हातमागावर वस्त्र विनण्याचे कार्य करणारे संत प्रवृत्तीचे श्री संभुआप्पा श्री बुवाफन महाराजांवर त्यांची अपार श्रध्दा दररोज सुर्योदयापूर्वी 13 किमी कृष्णा नदीवर जावुन पाण्याची घागर आणून त्या पाण्याने बुवाफन समाधीस स्नान घालत. त्या काळी घरोघरी जाउन सुत गोळा करण्याची प्रथा होती गोळा केलेले सुत विणून बाजारात ते विकावे व चरित्रार्थ चालावा ही दिनचर्या होती.
एका स्त्रीने संभुआप्पांना सुत नेण्यासाठी घरी बोलावून आतिल खोलीत सुत देतो असे सांगून मोहास बळी पाडण्याचा प्रयत्न केला पण संभुआप्पांनी स्त्री मोह ओळखून पळ काढला त्यानंतर त्या स्त्री ने तिला हा आपला अपमान वाटला म्हणून वरिष्ठांकडे दाद मागितली पण पोलीस पाटील व चावडीवरती तिचा टिकाव लागला नाही या घटनेने संभुआप्पानी नाहक बदनामी करीत लाजिरवाणे जगण्यापेक्षा गाव सोडण्याचा निर्णय घेतला व मच्छिंद्रगडाची वाट धरली पण तेथेही मण रमेना मण करवीर क्षेत्री आकर्षित झाले मच्छिंद्रगडाकडून करवीरकडे येताना वाटेत उरूण गाव लागले तेथे मुक्काम केला पहाटे गुरूंची आठवण झाली तेथून चालत कृष्णेकाठचा मालगावला जाउन समाधीची पुजा केली व पुन्हा उरूणात आले मन उरूणातच विसावले खेलजी पाटील, आप्पाजी कुलकर्णी यांसारखे भक्त लाभले पुन्हा पारंपारिक व्यवसाय सुरू केला परंतु दररोज पहाटे मालेगावला जाउन गुरूंच्या समाधीची पुजा कधीच चुकली नाही असे एक दोन नव्हे तर बारा वर्षे नित्यक्रम चालू असे एके काळी कृष्णेस पुर आला संभुआप्पांना पलिकडे कसे जावे याचा बोध होईन त्यांनी डोळे झाकले व आपल्या गुरूचा धावा केला खांद्यावरील घोंगडी पाण्यात सोडली व त्या घेंगाडीवर बसले आश्चर्याची गोष्ट म्हणजे संभुआप्पांसहीत ती घोंगडी पाण्यावर तरंगु लागली शिष्याची अपार भक्ती पाहून यापूढे भक्ताला त्रासद्यायचा नाही या जाणीवेने बुवाफन महाराजांनी दृष्टांत दिला व सांगितले यापुढे तु मालगावला येऊ नकोस मीच तुझ्या भेटीसाठी येईन पण आपण आल्याचे मला कसे कळणार यावर बुवाफननी म्हटले मी अनंत चतुर्थीस तुझ्या भेटीस येईन हातमागावरील डब-यातून उदाचा धूर व वास निघेल आणि एक सुळका दृष्टीस पडेल त्याच वेळी मी आल्याचे समज ठरल्याप्रमाणे अनंत चतुर्थीस सुळका वर आला गुरू आणि शिष्यांचा भेटीचा अनुभव सर्व उरूण वासियांनी अनुभवला दुस-या दिवशी संभुआप्पांपुढे पेच पडला गुरू प्रकट झाले ते स्थान पवित्र झाले तेथे पाय कसा ठेवायचा म्हणून वस्त्र विणने बंद केले आणि उपासमारी सुरू झाली त्यामुळे भक्तांनी एक दिवस एकाने दुस-या दिवशी एकाने अशी भोजनव्यवस्था सुरू केली अप्रत्यक्षपणे भक्तांची संख्याही वाढली येणा-या भक्तास संसारी उपदेश अस्पृश्यता जातीभेद न मानता उपदेश केला त्यांच्या या उपदेशामुळे संभुआप्पा भक्तगणांना देव वाटू लागला.

नगाराभेट
उरूणात संभुआप्पा नामक एका हिंदूने मुस्लिम गुरू केला आहे हे ऐकूण काही मुस्लिम चिडले मुस्लिम गुरू करण्यास तुला काय अधिकार हे विचारण्यासाठी नगारे व ढोल वाद्यांच्या गजरात ते मिरवणूकीने आले तुला मुस्लिम धार्मिया बद्दल काय माहितीअसे त्यांनी विचारले यावर संभुआप्पांनी हाती कोरा कागद घेवून संपुर्ण कुराण वाचून दाखविले भेदा-भेद न मानाता मानवता धर्माची शिकवण त्यांनी दिली. संभुअप्पांची गुरूवरील निष्ठा पाहून सारे नतमस्तक झाले व आठवण म्हणून सोबत वाजवत आणलेले नगारे तेथेच ठेवले आजही नगारखाण्यात हे नगारे असून मंडपचढविताना ते वाजविले जातात.

संभुअप्पांची महाराष्ट्रातील देवस्थाने
1) मालगावं तालुका मिरज 2) कराड 3) पेठ वडगांव 4) काले तालुका कराड 5) इचलकरंजी व इतर ठिकाणी

संभुआप्पा देवस्थानातील ऐतिहासिक वास्तू
1) बुवाफन तुरबत 2) संभुअप्पा समाधी स्थान 3) संभुअप्पा बुवाफन पादुका स्थान 4) संभुअप्पा पत्नी इरूबाई समाधी स्थान 5) संभुअप्पांचे मित्र खिलजी पाटील यांचे समाधी स्थान 6) संभुसंभुअप्पांनी अंगरखाच्या अस्तण्या पिळून निर्माण झालेला अड 7) साखर पडत असलेल्या लिंबाचे झाड 8) सौदागराने दिलेले भेटवस्तु
9) संभुअप्पांच्या हातमागाचे सुट्टे भाग 10) संभुअप्पां लिखीत कुराण प्रत 11) नगारखाना 12) सोनार सोपा इ.

समाधी
बुवाफन महाराजांना गुरू माणूण विठ्ठलावर भक्ती असणा-या उरूण इस्लामपूर परिसरातील भाविकाला भक्तीची आवड लावणा-या या थोर विभुतीने मंगळवार पौष् वैद्य नवमी ‘को 1663 या दिवशी भक्त व गुंरूच्या साक्षीने गुरूंच्या समाधीशेजारी जिवंत समाधी घेतली त्यानंतर पत्नी इरूबाई व मुलगा बाबुअप्पा यांनी मठाचा कारभार हाती घेतला बाबुअप्पा हे मठाचे पहिले मठाधिपती झाले. कार्तिक पोर्णिमा हा संभुअप्पांचा जन्मदिवस मानला जातो. याच दिवशी उरुस भरविण्याचे व चार दिवस आधी दशमी दिवशी पाच चांदण्या नक्षीदार कापडी मंडप चढवून गुळ वाटून आनंदा साजरी करण्याची प्रथा सुरू झाली.

संभुअप्पा मठ उरूण इस्लामपूर उरुस
1) हिंदू मुस्लिम ऐक्य गुरू शिष्य प्रेमाचे प्रतिक
2) संभुअप्पा बुवाफन मठ यमाई तलावासमोर उरूण भागत उभा आहे.
3) यात्रासुमारे 10 दिवस चालते यात्रेत बैलांचा बाजार, संपुर्ण महाराष्ट्रात मोठा मानला जातो.
4) तमाशा कलावंत वंश परंपरागत कला सादर करतात.
5) या मंदिराचे सध्याचे मठाधिपती रामचंद्र बुवासाहेब मठकरी हे आहेत. ( हे 10वे मठाधिपती )
6) तसेच इस्लामपूरचे देवत पीर संभुअप्पा हे पुस्तक राघवेंद्र मंद्रुपकर व खटावकर सर यांनी लिहिले आहे.

Emerging Markets: Next Economic Miracle?
“Emerging markets” is a useful term because it is imprecise. Coined for the convenience of investors
looking for somewhere exciting to put their money, it covers a bewildering range of economies with little in common, except that they are not too rich, not too poor and not too closed to foreign capital. The invention of “emerging markets” as an asset class required the invention of experts to manage those assets; experts who could discourse confidently ...
SYM Hall Islampur
Jayraj Gas Agency Islampur