Walwa Panchayat Samiti, Islampur
Upadate : Sunday, 24 August 2014, 12:00 IST
Walwa Panchayat Samiti, Islampur

वाळवा पंचायत समिती, इस्लामपूर
क्रांतीकारांची रण भूमी तर रत्नांची खाण असलेला वाळवा तालुका आधुनिकतेकडे गतीने वाटचाल करत आहे. कृष्णा व वारणा या दोन नदीच्या मध्ये वसल्यामुळे सुजलाम सुफलाम असलेला वाळवा तालुका.
वाळवा पंचायत समिती लोकांना सोई सुविधा देणेसाठी नेहमीच अग्रही असते. तालुक्यात एकूण ९४ ग्रामपंचायती असून सर्व ग्रामपंचायती इंटरनेटद्वारे जोडलेल्या आहेत. पंचायत समिती मार्फत शासनाच्या विविध योजना गावपातळीवर पोहचल्या जातात. शाळा, आंगणवाडी, ग्रामपंचायत यांचेवर नियंत्रण ठेवणेचे काम पंचायत समिती मार्फत केले जाते.
पंचायत समितीने निर्मल ग्राम योजनेमध्ये आघाडीचे काम केले असुन संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायत राज्यात तसेच तालुक्यातील पेठ ग्रामपंचायतीस केंद्र शासनाचा गौरव ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. यशवंत राज अभियानात तालुका अग्रेसर असून इको व्हिलेज योजनेंतर्गत ८९ गावे निवडलेली आहेत पैकी सन २०१३ – २०१४ मध्ये २५ गावांना विकासरत्न पुरस्कार मिळाला आहे.
इंदिरा आवास घरकुल, वसंत घरकुल दलित वस्ती सुधार योजना या पंचायत समिती मार्फत राबविल्या जातात. कृषी विभागा अंतर्गत शेतीची औजारे वाटप केली जातात.विशेष कौतुकाची बाब म्हणजे तालुक्यात ३९५ अंगणवाडया असून पैकी ३२ अंगणवाडया ISO मानांकन प्राप्त झालेल्या आहेत व १००% अंगणवाडया ISO करणेचा मानस आहे.
अधिक माहिती या वेबसाईटवर बघू शकता, www.panchayatsamitiwalwa.org


Jayraj Gas Agency Islampur